‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य

मुंबई  | देशात सध्या सर्व देशवासीयांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की नाही लॉकडाउनच्या निर्णयाच काय होणार?. काही राज्यांनी अंशत लॉकडाउनची मागणी केली आहे. अशातच ओडिशाच्या राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य आहे.

केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य करण्यात आलेलं नाही. लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच ओडिशा सरकारनं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगांना, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 204 वर गेली आहे तर 20 जणांचा आत्तापर्यंत मृत्यु झाला असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना: पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४

-कंगना रनौतच्या बहिणीची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाली…

-महाविकास आघाडीवरचं संकट टळलं; राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे आमदार होणार

-हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू

-मुंबईत कोरोनाबाधितांचा चढताक्रम; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स