महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी- सत्यजीत तांबे

मुंबई |  सरकारने जरी महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतला नाही.
महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी तसंच पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात या पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या भरत्यांमध्ये प्रडंच मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत त्याचीही चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली पाहिजे, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.

या मागण्यासंबंधी 1 मार्च अगोदर सरकारकडून कार्यवाही न झाल्यास विधानसभेवर या विरोधात धडक मोर्चा नेण्याचा ठराव सत्यजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत झाला. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंह यांची उपस्थिती होती.

दरम्यान, प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेले युवा जोडो अभियान आणि राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टर तथा NRU ची मोहीमेची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध ठराव या बैठकीत पारित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; सरकारी कामांसाठी जाताना आता सातबारा नेण्याची गरज नाही!

-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर भाजपने सरकार पाडून दाखवावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आव्हान

-पोरींना ‘लव्ह मॅरेज’ करू नका अशी नाही… तर चांगला ‘बॉयफ्रेंड’ निवडा अशी शपथ द्या- इंदुरीकर महाराज

-संभाजीराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर! म्हणाले…