नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई |  हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. घटनेचं वर्णन करणं अशक्य आहे. साहजिकच राज्यातील लोकांच्या मनात मोठा रोष आहे. त्या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

माझी आपणा सर्वांना हीच विनंती राहिन की, आपण जरा धीर धरा. आरोपीने केलेला गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध करून लवकरात लवकर नराधमाला शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे आंध्र प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात कडक कायदा करणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रात असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी सरकार घेईन, असं उद्धव म्हणाले.

गणघाटच्या पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिकेवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली आहे. नागरिकांनी पोलिसांवर देखील जोरदार दगडफेक केलीये. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

काही समजूतदार नागरिकांनी यावेळी दगडफेक करू नका, असं सांगितल्यावर त्यांनी दगडफेक बंद केली. यामध्ये रूग्णवाहिकेच्या काचा फुटल्या. यावेळी नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशी द्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकार पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं.. लवकरात लवकर न्याय देणार- बाळासाहेब थोरात

-‘या’ सदस्याच्या निधनानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा

-ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”