Top news मनोरंजन

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण

मुंबई | सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक आघाडीची अभिनेत्री आहे. 2 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत सोनालीचा कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा झाला होता.

आज सोनालीच्या साखरपुड्याला सहा महिने पूर्ण होत आहेत. याचंच औचित्य साधून सोनालीने आपल्या फेसबुक पेजवरून एक गोड आठवण शेअर केली आहे. सोबत सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

सोनालीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याने आपल्याला कसं प्रपोज केलं हे या पोस्टमध्ये सांगितलं आहे. सोनाली कुलकर्णीच्या चाहत्यांकडून या आठवणीला भरभरून पसंती मिळली आहे.

सोनाली गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्येच राहत आहे. दरम्यान, सोनालीने कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगवेळे पदार्थ बनवतानाचे, तसेच दुबईतील हॉटेल्समध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले होते.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!

मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा

आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा