Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

“औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार”

औरंगाबाद |  औरंगाबादचं नाव कधीही संभाजीनगर होऊ शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून महाराष्ट्राला सरप्राईज देतील, असं मोठं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

आम्ही हिंदुत्व कधी सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. राष्ट्रवादीत देखील अशी लोकं आहेत की ज्यांना संभाजी महाराज प्रिय आहेत. राष्ट्रवादीत संभाजीमहाराजांना मानणारी लोकं आहेत, असं खैरे म्हणाले.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2 महिन्यांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासंबंधी जी काही माहिती लागते ती माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

पाठीमागे शिवसेनेची सत्ता असताना तुम्ही औरंगाबादचं नाव का बदललं नाही, असा प्रश्न विचारला असता, मी अनेक वेळा संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अनेकदा पत्र लिहिली. मात्र त्यांनीही काही केलं नाही, असं खैरेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

-खरे चाणक्य कोण शरद पवार की तुम्ही??; अमित शहांनी दिलेलं उत्तर तुफान व्हायरल

-भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहणार भिंत

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

Loading...