उपराष्ट्रपतींचं ‘ते’ वक्तव्य शिवभक्तांच्या भावना दुखावणारं ; शिवप्रेमींबरोबर राज्यकर्ते ही संतप्त !

नाशिक | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही शपथ घेतली. शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी ‘ जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष केला. त्यामुळे व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. महाराजांच्या वारसावरच आक्षेप घेतल्यामुळे शिवसैनिकांबरोबर राज्यकर्तेही संताप व्यक्त करत आहेत.

व्यंकय्या नायडू यावेळी म्हणाले होते, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजे भोसले यांनी यापुढे दक्षता घ्यावी, ”

व्यंकय्या नायडू यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी या आशयाचे पत्र पाठवत निषेध व्यक्त केला आहे. तसेच नाशिकबरोबर पुण्यातही संभाजी ब्रिगेडने आंदोलनास सुरुवात केली आहे.

त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटर वरून “छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?” असा जाब विचारात भाजपवर सणसणीत टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला खासदारालाही कोरोनाची लागण

इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही; गेहलोत यांचे मोदींना पत्र

पोटच्या मुलानं नाकारलं अन् सख्ख्या भावानं सोडलं; ‘ती’ स्मशानात एकटीच जळत राहिली!

उपचारासाठी बेड मिळावं म्हणून आठ तास आंदोलन करणाऱ्या युवकाचा अखेर मृत्यू

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!