शिवसेनेनं केलेल्या ‘या’ मागणीमुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. अशात आता शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र आता हा आकडा आणखी वाढला आहे.

दरम्यान, महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत.

सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे.

एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण…” 

एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका; विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य 

‘…तर घर गाठणं कठीण होईल’; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी 

एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले… 

“एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपच, अजित पवारांना माहिती नाही”