कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद व्यक्त, पाहा व्हिडीओ

रत्नागिरी |  आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होताना पाहायला मिळतं आहे.

अशातच एका कोरोनामुक्त झालेल्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हाडीओमध्ये तरूण कोरोनामुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

गुहानगरमधील एका कोविड सेंटरमधील तरूण एका गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्याबरोबर तिथे उपस्थित असेलेले डॉक्टर, कर्मचारीही त्याला साथ देत आहेत. तसेच त्याचा डान्स पाहून त्या ठिकाणी असलेले कोरोनाबाधित रूग्णही गाण्याच्या बिटवर ठेका धरताना दिसतं आहे.

तरूणाने अंगावर निळ्या रंगाचं पीपीटी किट असून, त्यासोबतच तोंडाला मास्कही लावलं आहे. तरूणाच्या या डान्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हा व्हायरल होत असेला व्हिडीओ या ‘TV9 Marathi’ यु ट्यूब चॅनलने शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंटही केलं आहे. तसेच आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 17 हजार लोकांनी पाहिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॅनडात राहणारा भांगडा कलाकार गुरदीप पंधेर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आपला आनंद डान्स करत व्यक्त केला होता. तसेच त्यानी डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
त्या व्हिडीओमध्ये त्यानी भांगडा केला होता. त्याचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…

चक्क जावयासोबत सासू गेली पळून, त्यानंतर जे घडलं ते ऐकून…