Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde 8

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

2014 ते 2019 यावेळी भाजपसोबत युतीची सत्ता असताना, मला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होते, असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

2014 साली भाजप शिवसेनेचे युती सरकार असताना, भाजपने शिवसेनेेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. तुमच्याकडे एक नवीन जबाबदारी येणार आहे, असे मला फडणवीस म्हणाले होते.

शिवसेनेला हे पद मान्य होणार नाही, हे मला आधीच माहित होते. कारण तेव्हा उपमुख्यमंत्रीपद मला द्यावे लागणार होते, त्यामुळे शिवसेनेने तेव्हा उपमुख्यमंत्रीपद नाकारले, असे शिंदे म्हणाले.

तसेच आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही दुसरा पक्ष काढला नाही. शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ही सगळ्यांनी उभी केलेली शिवसेना (Shivsena) आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

बाळासाहेबांनी काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादीला (NCP) जवळ करु नका, असे म्हंटले होते. त्यांना जवळ कोणी केले? आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली. आमच्यासोबत 50 आमदार आले, असे शिंदे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”

“…तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला कळेल”; शशी थरुर यांची स्पष्टोक्ती

‘नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका’

‘या’ योजनेत महिन्याला 95 रुपये भरा आणि व्हा लखपती

‘सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील सभेत गोंधळ’