पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

पुणे | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 60 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. आता पुण्यातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आलं होतं. त्याच रात्री तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. पण या रुग्णालयात उपचार न करता तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

60 वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिचा शुक्रवारी रात्री घरीच मृत्यू झाला.

दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…

-मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?; फडणवीस म्हणाले…

-उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही- देवेंद्र फडणवीस

-“दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा आता रद्दच करा”

-कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे