महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

‘राष्ट्रवादी’चं स्तुत्य पाऊल; तिवरे दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं वाटप

NCP

रत्नागिरी : तिवरे धरण दुुर्घटनाग्रस्तांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीने स्तुत्य असं पाऊल उचललं. तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादीने मदतीचं वाटप केलं.

प्रत्येक पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत केली. शरद पवारांच्या उपस्थितीतच धनादेशांचं वाटप करण्यात आलं.

तिवरे धरणतील पीडित कुटुंबांची शरद पवारांनी भेट घेतली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. स्थानिकांशी त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

शासनाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचे समजले. साधारण ४५ कुटुंबं बाधित झाली आहेत, २३ जण मृत्युमुखी पडले आहेत. तिघांचे मृतदेह अजूनही हाती लागलेले नाहीत. शासनाने तातडीने याची दखल घेण्याची गरज आहे.- शरद पवार

शरद पवार यांनी या भेटीनंतर काही ट्विट केली आहेत. ती खालीलप्रमाणे-