Top news

निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…

जळगाव | माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथी समाजाकडून जळगावात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना उद्देशून निलेश राणे यांनी टीका केली. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दांवर तृतीय पंथियांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली.

निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट

-‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द

-कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

-झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला