“चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती”

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आपली नाराजी जाहीर केली आहे. चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशात काय सुरु आहे हे चीनने लवकर सांगायला हवं होतं. जोपर्यंत हे सार्वजनिक झालं नाही तोपर्यंत आम्हाला याची काहीच माहिती नव्हती. चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो आणि हे फार दुर्दैवी असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

मी चीनवर थोडा नाराज आहे. मी त्यांना मदतीसाठी काही लोक पाठवू का अशी विचारणा केली होती. पण त्यांना मदत नको आहे, हा त्यांचा अभिमान आहे. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, 24 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरससोबत लढा देताना ठेवलेल्या पारदर्शकतेवरुन चीन आणि शी जिनपिंग यांचं कौतुक केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या – 

-अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू

-“संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही, आता संचार बंदी लागू करा”

-मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

-कोरोनासोबतची आपली लढाई संपली नसून आता खरी सुरुवात झाली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-महाराष्ट्र लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय काय होणार??