पुणे महाराष्ट्र

आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

पुणे |  मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे, आईवरून शिव्या देणारे, माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण आहेत, असा आरोप करत आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता, असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

मागील आठवड्यात जितेंद्र राऊतने महाराणी येसूबाईंविषयी एक वाक्य अपमानास्पद लिहिले, शिवी दिली ते नक्कीच चुकीचे होते त्याचा निषेधच आहे. पण जितेंद्र राऊत वर पिसाळून त्याच्या अंगावर जाणारे मराठे जेव्हा मला अशाच शिव्या देत आहेत, चारित्र्यहनन करत होते, जे माझे नाहीत असे घाणेरडे फोटो शेअर करत होते तेव्हा मी पण त्यांचा जितेंद्र राऊत करणे अपेक्षित होते का किंवा आहे का?…. याचे उत्तर मला माननीय छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी दिले तर बरं होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

ज्या मराठ्यांचा इतिहास सगळीकडे सांगितला जातो, आमच्या राजाने महिलांना कशी इज्जत द्यावी, परस्त्री ही मातेसमान आहे हे शिकविले…. छत्रपती शिवाजी महाराजांना मला आज सांगायचं आहे, महाराज तुम्ही जिथे कुठे असाल तिथून नक्कीच हे पहात असाल . तुमचे मावळे तुमचा फोटो प्रोफाइल पिक्चर ठेवून आज माझ्या सारख्या महिलेला घाणेरड्या शिव्या देत आहेत, मी चांगले काम करत असताना मला बदनाम करीत आहेत, अशांना तुमचे मावळे तरी कसे म्हणायचे?, अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराज मला खूप अभिमान आहे कि मी छत्रपतींची लेक आहे परंतु आज कुठेतरी लाज वाटते सांगायला की “मी मराठा आहे”…., अशी खंत व्यक्त करत महाराज आज आपण पाहिजे होतात आज नक्कीच एक लढवय्या स्त्री म्हणून माझा सन्मान नक्कीच आपण केला असतात आणि अशा तरुणांचे जे महिलांचा अपमान, चारित्र्यहनन करतात त्यांना तुमच्या पद्धतीने शिक्षा केली असती, असं त्या म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास

-कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज

-बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

-कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र