तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना दाखवला कायद्याचा धाक; वकिलामार्फत धाडली नोटीस

पुणे | प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. इंदोरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन तृप्ती देसाई आणि इंदोरीकर यांच्यात चांगलीच जुंपलीय. हा वाद आणखी मिटलेला नाही. यातच आता तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना नोटीस पाठलली आहे.

महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदोरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही तसेच अशी वक्तव्य मी पुढे कीर्तनात करणार नाही असे कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेले नाही, असं सांगत तृप्ती देसाई यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

इंदोरीकर यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी आणि चारित्र्य हनन गेले आठ दिवस सुरू आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या बाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणार नाही असंही जाहीर करावं. यासाठी वकिलामार्फत तृप्ती देसाई यांनी नोटीस पाठवलेली आहे.

ॲडव्होकेट मिलिंद पवार ,पुणे यांच्या माध्यमातून ही नोटीस इंदोरीकर यांच्या पत्त्यावर पाठवली असून दहा दिवसात त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा असतील अशा पक्षात राहू शकत नाही’; भाजप महिला नेत्याचा राजीनामा

-… तर MPSC च्या अध्यक्षाची गाढवावरून धिंड काढू; गोपीचंद पडळकर आक्रमक

-“महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू माफियांचंच वर्चस्व”

-शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय लागलीय… ती बंद झाली पाहिजे- मंत्री हसन मुश्रीफ

-अत्याचारग्रस्त कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची रूपाली चाकणकरांनी उचलली जबाबदारी!