Loading...
पुणे महाराष्ट्र

इंदुरीकरांच्या मुसक्या आवळा- तृप्ती देसाई

पुणे | आपल्या कीर्तनातून भल्याभल्यांची भंबेरी उडवणारे आणि तुफान फॅन फोलोविंग असणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्याच कीर्तनातील वक्तव्याने चांगलेच गोत्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आधी संभाजी भिडे आणि आता इंदुरीकर महाराज. स्त्रियांबद्दल असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

Loading...

ओझर येथे झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा दावा इंदुरीकरांवर महाराजांनी केला होता.

दरम्यान,  महाराजांना केलेलं वकतव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. PCPNDT कायद्यानुसार कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या- 

-‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं होणार बॉलिवूडमध्ये लॉन्चिंग

-न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे; विजय सत्याचाच होईल- रोहीत पवार

-‘तेरे दर पर सनम चले आये’; लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला

-…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस

-वडील चालवतात पंक्चरचं दुकान; अन् लेक झाला सलग दोन वेळा दिल्लीचा आमदार

Loading...