“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

पुणे |  मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे, आईवरून शिव्या देणारे, माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण आहेत. मी पण मराठ्यांचीच लेक आणि सून आहे. छत्रपतींची शिकवण मराठे विसरायला लागलेत हे यावरूनच लक्षात आले, असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

जी महिला सामाजिक काम करते, एखाद्या विषयावर आवाज उठवते तिला ट्रोल करायचं, तिची आणि त्यांची कधी भेट ही झालेली नसते तरी तिच्या विषयी माहीत नसलेल्या खोट्या गोष्टी शेअर करून तिची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्यात आघाडीवर मराठा समाज आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

मला हे कधी लिहायचं नव्हतं कारण मराठ्यांची बदनामी होईल म्हणून, पण लिहावं लागतंय, कारण छत्रपतींची शिकवण मराठा विसरायला लागलेत आणि आपल्याच आई बहिणीला रांड, कुत्री, साली अशा शिव्या द्यायला लागलेत, या शिव्या मला आलेल्या आहेत म्हणून मी लिहिल्या आहेत… माझी एखादी गोष्ट पटली नाही तर नक्कीच विरोध झाला पाहिजे. परंतु एखाद्या महिलेला इतका त्रास द्यायचा ,इतके बदनाम करायचे की तिने आत्महत्या केली पाहिजे असे सध्या सोशल मीडियावर लोक उपलब्ध आहेत. ती महिला कोणाची तरी मुलगी आहे, बहिण आहे ,आई आहे, सून आहे हे सुद्धा विसरायला लागले आहेत, अशी खंत व्यक्त करत अनेकांनी मला बदनाम केले परंतु या सगळ्यात जास्त मराठा समाज अग्रेसर होता आणि आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

खूप वाईट वाटले की राजमाता जिजाऊंचा प्रोफाइल पिक्चर लावून ,छत्रपती शिवरायांचा प्रोफाईल पिक्चर लावून ,छत्रपती संभाजी राजांचा प्रोफाइल पिक्चर स्वतःच्या फेसबूकअकाउंटवर लावून मला घाणेरड्या शिव्या, चारित्र्यहनन करण्यात आले, त्या सर्वांचे स्क्रीनशॉट माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि माझी सगळ्यात जास्त बदनामी करणारे फेसबुकवर कुठले ग्रुप होते तर ते एक करोड मराठ्यांचा ग्रुप, शिवप्रेमी असे अनेक ग्रुप होते ….. आज मला खूप वाईट वाटतंय गेल्या एक महिन्यापासून हे सर्व माझी बदनामी करत आहेत परंतु आज पर्यंत मी मराठा समाजाची आहे हा मला अभिमान होता पण आज देवाने मला मराठा समाजात का जन्माला घातले? जिथे महिलेचा सन्मान केला जात नाही असा प्रश्न मला पडलाय?, असं त्या म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास

-कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज

-बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

-कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

-लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय