Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’

Eknath Shinde

मुंबई | भाजपकडून विविध पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचे सत्र सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांतून भाजपात गेलेल्या नेत्यांची आणि आमदार खासदरांची संख्या मोठी आहे.

मागील दोन महिन्यांत महाराष्ट्रातील सत्तापालट झाल्यावर शिवसेनेतून काही लोक भाजपात गेले, तर काही लोक एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. आता पालघरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे.

पालघर मधील शिवसेनेच्या दोन माजी आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात शिवसेनेचे एक जुने निष्ठावंत नेते होते. आणि एक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते होते.

हा प्रवेश उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. पालघरमधील शिवसेनेचे अमित घोडा आणि विलास तरे यांनी भाजपात प्रवेश केला.

आता या प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून हिंदुत्व आणि इतर कारणांमुळे बाहेर पडले होते. आता त्यांच्यासोबत असलेले आमदार देखील त्यांचीच री ओढत आहेत.

परंतु शिंदे यांना बगल देऊन तरेंनी त्यांचे जुने विश्वासू सहकारी असताना देखील भाजपात प्रवेश केल्याने हा प्रवेश चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तरे हे शिंदे यांच्या गटात जातील अशी चर्चा होती.

महत्वाच्या बातम्या –

“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’

रामदास कदमांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या, तुमच्या बापाच्या…

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा दणका देण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…