Loading...
पुणे महाराष्ट्र

कमलनाथांनी तमाम शिवभक्तांची माफी मागा; उदयनराजे भडकले

सातारा | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.

Loading...

स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार! जय शिवराय!, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्य प्रदेशमधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपलं ‘प्रेम’ दाखवलंच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?, असा सवाल करत भाजपने या प्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, हिंमत असेल तर एकट्याने विधानसभा निवडणूक लढवून दाखवा- चंद्रकांत पाटील

-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले

-“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय पण…”

-दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना सल्ला

-…तर मनसेचा राज्यात एकही आमदार दिसणार नाही; इम्तियाज जलीलांचा इशारा

Loading...