Top news महाराष्ट्र

मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाला हरवण्यासाठी मी वाटेल ते पाऊल उचलेल अन् मी माझ्या महाराष्ट्राला संकटापासून वाचवेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी आज महाराष्ट्रवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या लढाईच्या जो विरोधात काम करेल, त्याला गालबोट लावेल तर माफ करणार नाही, असा इशारा दिला.

संयमाची भाषा वापरत आहे, विनंती करतोय, हात जोडतोय, जात-धर्म कोणताही असो कोरोना वायरस एकच आहे, मात्र समाजात दुही निर्माण करण्याचा वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर कोविडपासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही, असंही ते म्हणाले.

सात वर्षाच्या आराध्याने वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. त्याचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. तसंच एवढ्याशा चिमुरड्याने मदत केली त्यामुळे हे युद्ध आपण जिंकलं असंच समजा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही. जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला. तसंट जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस एकच आहे.  सिंगापूरने लॉकडाऊनला सुरुवात केली, आपणही तेच केलंय, कोरोनावर ईलाज म्हणजे नाईलाजाने घरात बसणे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!

-डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा- अमित शहा

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या”

-देशात राहून बेइमानी करणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा, भोजपुरी अभिनेत्याची पंतप्रधानांकडे मागणी

-निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?- राज ठाकरे