औषधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा, काही औषधे मोफत देण्याचा सरकारचा विचार- मुख्यमंत्री

मुंबई | कोरोना रुग्णांवरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगताना जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

आपला महाराष्ट्र उपचारात जगाबरोबरीने उभा असल्याचे सांगताना ते म्हणाले, प्लाझ्मा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च – एप्रिलपासून झाली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले तर ७ जण घरीही गेले. प्लाझ्मा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडीज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही केले.

रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळित झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय-निमशासकीय रुग्णालयातही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.

आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवताना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांना धन्यवाद दिले.

महत्वाच्या बातम्या-

-‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

-तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

-गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

-नाना पाटेकरांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन घेतली त्याच्या कुटुंबियांची भेट

-पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…