Loading...
Top news महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नागरिक किराणा दुकानं तसेच भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

अत्यावश्यक सेवांची दुकानं आता 24 तास खुली असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नागरिकांनी दुकानात गर्दी करू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे.

Loading...

लॉक डाऊन असल्याने अनेक ठिकाणी नागरिक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करत आहेत, तसेच अन्नधान्यांच्या दुकानातही मोठी गर्दी होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकान आता 24 तास खुली ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, आता अत्यावश्यक सेवांची दुकानं 24 तास खुली राहणार असल्याने नागरिकांनी दुकानांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

चंद्रकांत पाटलांचा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

-बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत

-“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

-सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

Loading...