‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तसंच लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुरळित करण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना तसंच उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची साद घातली.

गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असून गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार विविध कंपन्यांसोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यामध्ये भूमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घरातच राहा, सुरक्षित राहा. शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरु होणार या भ्रमात न राहण्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असे नाही, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वच्छता पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या-

-तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

-गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

-नाना पाटेकरांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन घेतली त्याच्या कुटुंबियांची भेट

-पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

-शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…