“संपादकपदी रश्मी ठाकरे म्हणून सामनाची भाषा बदलणार नाही, संपादकीय राऊतांकडेच”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत. ‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली. मात्र संपादकपदी रश्मी ठाकरे म्हणून सामनाची भाषा बदलणार नाही. सामनाची भाषा आणि दिशा तीच राहिल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सामनाचं संपादकपद, शेतकरी कर्जमाफी, मुस्लिम आरक्षण, अयोध्यावारी, CAA आणि NRC बद्दलची भूमिका यावर उद्धव ठाकरेंनी आपली मतं मांडली.

सामनाची भाषा ही पितृभाषा आहे. सामनाच्या भाषेमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसंच संपादकीय विभागाची जबाबदारी ही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडेच राहणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

शेतकरी कर्जमाफीची योजना लवकरात लवकर पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर व्हायला सुरूवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 7 तारखेला मी अयोध्येला जाणार आहे. अयोध्येत जाऊन मी प्रभू रामाचं दर्शन घेणार आहे. देव सर्वांचा आहे त्यामुळे यामध्ये राजकारण येत नाही, असंही त्यांनी काँग्रेसला सूचकपणे सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल

-विद्या चव्हाणांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले; म्हणतात, ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध’!

-मोदींनी सोशल मीडिया सोडू नये; त्यांचे करोडो फॅन्स अनाथ होतील- संजय राऊत

-“पवारांच्या धसक्यामुळे तर मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला नसेल ना??”

-“जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी…. अन् मोदी आहेत तोपर्यंत मी!”