महाराष्ट्र मुंबई

दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं.

स्वत:कडे एकही वाहन नाही, दोन घरं आहेत, एक फार्महाऊस आहे, तसंच विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे उत्पन्नाचं स्त्रोत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्याचं कळतंय.

उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती.

उद्धव ठाकरेंची पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणे असल्याची माहिती आहे. त्यातील 12 प्रकरणे रद्द झाली आहेत. बाकीची प्रकरणे खासगी तक्रारी आहे. फक्त एकच प्रकरण नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रभादेवी ‘सामना’ कार्यालयाबाहेर झालेला राड्याचं प्रकरण असल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”

-11 मे ते 17 मे पर्यंत ‘या’ परिसरात संपूर्ण लॉकडाऊन; पुणे मनपा प्रशासनाचा मोठा निर्णय

-तर मी सेहवागला सोडलंच नसतं- शोएब अख्तर

-भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर