शिवनेरीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता!

मुबंई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्यातील जनतेच्या दृष्टीने एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासमिकरण बदलून आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. यादरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाईल तसेच कुलदैवत एकवीरा देवीचं ही दर्शन घेईल, असंही ठाकरे म्हणाले होते.

गेल्या वर्षीही अयोध्या दौऱ्यापुर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर गेले होते. शिवरायांच्या पावलांनी पवित्र झालेली शिवनेरी गडावरील मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे गेल्या वर्षी अयोध्येला गेले होते.

उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याचं लक्ष लागून राहीलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता जनतेला लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-