मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

मुंबई |  मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अधिकाऱ्याचे स्वॅब चाचणीकरिता पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील 12 पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस समाजरक्षणासाठी काटेकोर कर्तव्य बजावत असताना, त्यांनाही आता कोरोनाची लागण होत असल्याने, सध्यस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

खबरदारी म्हणून या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील 12 पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांना पुढील 14 दिवस आहेत त्याच ठिकाणी म्हणजे, डीसीपी कार्यालयातच राहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….

-‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका

-‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

-आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

-“लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने किमान वेतन द्या”