Loading...
महाराष्ट्र मुंबई

कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

मुंबई | दिग्दर्शक उमेश शुक्ला आता भारतातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत. या बायोपिकचे नाव ‘निकम’ असं ठेवलं आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे.

आतापर्यंत भारतातील सर्वात वादग्रस्त आणि हाय प्रोफाईल प्रकरणात दमदार भूमिका निभवणाऱ्या व्यक्तीची कथा यामधून सांगितली जाणार आहे. ही कथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता लेखक  भावेश मंडलिया आणि गौरव शुक्ला यांनी लिहिली आहे. तर उमेश शुक्ला, सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया चित्रपटाचे निर्माते आहेत.

Loading...

माझ्यावर पुस्तक आणि चित्रपट तयार करण्यासाठी काही वर्षांपासून अनेकजण मागे लागले आहेत. यासाठी माझी बिलकूल इच्छा नव्हती. कारण माझ्यावर अनेक पीडित लोकांची मोठी जबाबदारी आहे. पण प्रतिभाशाली टीमसोबत भेट झाल्यावर मी या चित्रपटासाठी तयार झालो, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय.

मला विश्वास आहे की, माझी कथा व्यवस्थित या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाईल, असंही निकम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“दांडी मार्च ते दंडा मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली”

-शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

-नवऱ्याला आवडली नाही नवरीची साडी म्हणून नवऱ्याने मोडली संसाराची घडी

-…तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी- नाना पटोले

-‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

Loading...