पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, पवारांचीही भेट घेण्याची शक्यता!

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती समजत आहे. अशातच पार्थ पवार मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

पार्थ पवार आता सिल्वर ओकवर खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास 10 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

राष्ट्रवादीमध्ये चालू असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांंगलच ढवळून निघालं आहे. आजच्या भेटीत पार्थ पवार काय होत?, हे खूप महत्वाचं असून त्यावर पार्थ पवारांच्य पुढील वाटचालीबद्दस कळणार आहे. पार्थ पवार बंड पुकारणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पार्थ पवारांबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. कारण काल अजित पवारही बैठकीतून जाताना त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले होते. त्यामुळे पार्थ पवार नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय दत्तला कर्करोगाचं निदान झाल्यावर पत्नी मान्यताची भावनिक पोस्ट; म्हणाली…

“अजित पवारांनी आणि पाटलांनी बाकी पक्षांच्या आमदारांची चिंता नका करू नये, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा”

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तसं करणार नाही, भाजपने हा वाद सुरू केला; मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण

“सुशांतच्या मृत्युवरून पत्रकार परिषद घेणाऱ्या राणेंनी मात्र आपला भाऊ अंकुश राणेंच्या हत्येबाबत ब्रही नाही”

शरद पवार म्हणाले पार्थ इमॅच्युअर, त्यालाच ‘नया है वह’ असं म्हणतात- छगन भुजबळ