UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसल्याने लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरी सेवा पूर्व परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे.

31 मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. 4 मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 20 मे रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख वेसबाइटवर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नवीन तारीख ठरवल्यानंतर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे. तसेच लॉकडाउनमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

-परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर

-रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

-उद्धव ठाकरेंसह शिवसेनेकडून विधानपरिषदेचा दुसरा उमेदवारही निश्चित

-‘मजुरांना विनामूल्य रेल्वेसेवा द्या’; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो