महाराष्ट्र मुंबई

मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे.

मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. शिवसेना कधीही झेंड्याचा रंग बदलणार नाही. एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेलं आहे. जगाला माहिती आहे आमचं हिंदुत्व काय आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शिवसेना आमदारांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली म्हणजे आम्ही हिंदूत्व सोडलं असं होत नाही. मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसेनं आपल्या पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. त्यामुळे मनसे हिंदूत्वाकडे झुकल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल

-“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”

-“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

-“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”