…म्हणून किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!

मुंबई | इंडियन प्रीमियल लीग म्हणजेच आयपीएल. भारतीय क्रिकेट चाहत्यांची उन्हाळी सुट्टी आयपीएलच्या हंगामाचा थरार पाहण्यात जाते.  परंतू यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरानाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा थरार अनुभवायला मिळाला नाही. मात्र यावर्षीच्या स्पर्धेच आयोजन हे युएईमध्ये करण्यात आलं आहे.

यंदाच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा ही युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी सर्व संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. अशाताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीतच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघात गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा खेळाडू आहे. मूळचा हा विदर्भाचा क्रिकेटपटू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या बीसीसीआयने मर्यादीत खेळाडू घेऊन जायला सांगितलं आहे.

बंगळुरु संघात मोठ्या स्टार खेळाडूंचा भरणा आहे. संघाची फलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे नेटमध्ये फलांदाजांना सरावासाठी वेगवान गोलंदाजांची आवश्यकता होती. नेटमध्ये सराव करताना विराट आणि प्रशिक्षकांना ठाकरेची गोलंदाजी आवडली म्हणून संघ प्रशासन आणि कर्णधार विराट कोहलीने आदित्यला निवडलं असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लशीचा परिणाम, सोन्या-चांदीच्या भावात तब्बल ‘इतक्या’ हजाराने घरसण!

“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही”; भाजप पदाधिकारणीचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

“गुन्हा दाखल करून काही होणार नाही संजय राऊतांना सरळ जेलमध्ये टाका”

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीरपणे काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं- निलेश राणे