महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या टिकटाॅक व्हीडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

मुंबई | देशभरातील तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच व्हिडीओद्वारे वेड लावण्याऱ्या टीकटॉक या मोबाईल अ‌ॅपवर आता एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नववारी साडीतील एका तरुणीचा हा टीकटॉक व्हिडीओ लाखो लोकांच्या व्हॉट्स अ‌ॅपच्या स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे.

19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणारी शिवजयंती हे या व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं खास कारण आहे. या व्हिडीओमध्ये नववारी नेसलेली तरुणी पारंपारिक अलंकार परिधान करुन रस्त्याने चालत जाताना दिसत आहे. तिच्या समोर येऊन अनेकजण मुजरा करताना, दर्शन घेताना दाखवण्यात आले आहेत.

पहिल्या काही सेकंदात जिजाऊच्या लेकीला मुजरा घालत असल्याचं जाणवत. मात्र काही सेकंदानंतर कॅमेरा पुढच्या बाजूने दाखवताच त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. शिवरायांच्या मूर्तीला पाहून सर्वजण नतमस्तक होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शिवजयंती असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवप्रेमींचा या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांनी दिला मुंबईच्या डबेवाल्यांना सुखद धक्का; देणार…

-मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय चुकीचा; आघाडीत वादाच्या ठिणग्या

-कोल्हेंना चिमूरडीची भावनिक साद; आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला… ते तुम्हाला पकडतील…

-देशातील बेरोजगारी आणि महागाईला फक्त केंद्र सरकारच जबाबदार; सुप्रिया सुळेचं मोदी सरकारवर टीकास्त्र

-अखेर राज्यसरकारने भीमा कोरेगावचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला