खेळ

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा ‘ब्युटीफूट बॉय’ पाहिला का?

Virat Kohli Anushka Sharma

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहे. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यामुळे विराट आनंदात आहे, तर लवकरच सुई-धागा सिनेमा येणार असल्यानं अनुष्का खूश आहे. अनुष्काच्या मिम्सची देखील प्रचंड चर्चा आहे. मात्र आता विराटचं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. 

काय आहे विराटच्या ट्विटमध्ये?

विराट कोहलीनं एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला त्यानं ‘Met this beautiful boy who was patient enough to take a picture with us’ असं कॅप्शन दिलं आहे. एका कुत्र्यासोबत हा फोटो काढण्यात आला आहे. एका शॉपमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर या दोघांनी या कुत्र्यासोबत गुडघ्यावर बसून फोटो काढला आहे. विराटनं त्या कुत्र्याला ‘ब्युटीफूल बॉय’ असं म्हटलं आहे. 

कसोटी सामन्यांमध्ये काय सुरु आहे?

भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन सामने गमावले होते. त्यानंतर तिसरा कसोटी सामना भारतीय संघानं जिंकला आहे. आणखी दोन कसोटी सामने बाकी आहेत. मालिका जिंकायची असेल तर हे दोन्ही सामने जिंकणं भारतीय संघासाठी महत्त्वाचं आहे.