“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे, याचा सकारात्मक परिणाम दिसत असून देशातील कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्‍यात येईल, असा दावा नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केला आहे. पॉल हे केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या वैद्यकीय उपकरण पुरवठा आणि व्यवस्थापन गटाचे नेतृत्व करत आहेत.

याआधी 2 वेळा लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा झालेला फायदा वाया जाऊ नये, यासाठी 4 मे नंतर पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढवण्यात आला. आता ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे, त्या ठिकाणी चाचण्या घेऊन हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं ते म्हणाले.

आतापर्यंतच्या कडक लॉकडाऊनमुळे भारतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश मिळाले आहे. सामाजिक पातळीवर भारतामध्ये संसर्ग झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “तसे झाले असते तर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती, इतर देशात ज्या वेगाने करोना व्हायरस वाढला आहे आणि मृत्यूचे प्रमाण जितके आहे त्यापेक्षा भारतातील परिस्थिती कितीतरी चांगली आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊनअगोदर 3 ते 5 दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. आता हे प्रमाण 11 ते 12 दिवसावर आले आहे. हे लॉकडाऊनचे यश आहे. मात्र भारतासारख्या मोठ्या देशात आगामी काळातही अशा उपाययोजना कमी-अधिक प्रमाणात चालू ठेवाव्या लागणार आहेत, असं पॉल म्हणाले. ”

महत्वाच्या बातम्या-

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

-…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा

-“फडणवीस, महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली करत आहेत हे क्लेशदायक”

-…तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत, असंच म्हणावं लागेल- संजय राऊत

-त्यांनी तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागतायत; राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाना