Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली”

sanjay raut speak 3

मुंबई | महाराष्ट्रातील वातावरण सध्या अनेक मुद्द्यांनी तापलं आहे. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालल्याचं पहायला मिळत आहे.

आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कुणाच्यातरी पाठबळात तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल, मुंबईत येऊन, तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? असा प्रश्नही राऊत यांनी केला आहे.

आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.

आम्ही राष्ट्रपती राजवट, ईडी आणि सीबीआय या सगळ्याच्या पलीकडे गेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं एक अजरामर वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे, असही राऊत यांनी म्हटलं आहे.

सत्ता ही फक्त खुर्चीची नसते, शिवसेना हीच एक सत्ता आहे आणि या सत्तेचे चटके आतापर्यंत अनेकांनी घेतले आहेत, तुम्हालाही घ्यायचे असेल तर घ्या, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड… ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही.

दरम्यान, राणा दाम्पत्याच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे

महत्त्वाच्या बातम्या – 

  “उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”

  ‘मुख्यमंत्र्यांवर किती हल्ले झाले तरी त्यांनी….’; सुप्रिया सुळेंकडून कौतुकांचा वर्षाव

  ‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी’; राणा दाम्पत्यांचा हल्लाबोल

  राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

  “शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल