क्या बात है! आता तुरुंगात सुरू होतंय रेडिओ स्टेशन, गुन्हेगार होणार रेडिओ जॉकी

मुंबई | गुन्हेगार हा देखील एक माणूसच असतो. त्यांना देखील भाव भावना असतात. यामुळे या कैद्यांना सुधरवण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी देशातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. कैद्यांसाठी तुरुंगात शिक्षणाची व्यवस्था देखील केली जाते.

एवढंच नाही तर या कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी देखील उपक्रम राबविले जातात. आपल्या कुटुंबापासून लांब राहणाऱ्या कैद्यांचं मानसिक आरोग्य नीट राहावं यासाठी देखील वेगवेगळे प्रयत्न केले जातात. तसेच त्यांना तुरुंगातंच विविध कामे देत पैसे कमावण्याची संधी देखील दिली जाते.

एवढंच नव्हे तर भारतात काही ठिकाणी कैद्यांना बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत देखील केली जाते. यासाठी देशभरातील अनेक वेगवेगळ्या संस्था काम करतात. अनेक सामाजिक संस्थांचे अमूल्य कार्य आणि भारत सरकारचा हातभार यामुळे कित्येक कैदी समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.

सध्या चंदिगढमध्ये देखील कैद्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. चंदिगढच्या तुरुंगातील कैद्यांसाठी आता कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर या कम्युनिटी रेडिओचं सर्व काम कैदीच पाहणार आहेत.

तुरुंगातील या कम्युनिटी रेडिओमध्ये अगदी रेडिओ जॉकी म्हणून देखील कैदीच काम संभाळणार आहेत. यामुळे चंदिगढ तुरुंगातील कैद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चंदिगढ तुरुंग विभागाचे सहायक महानिरीक्षक विराट यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

सहायक महानिरीक्षक विराट म्हणाले की, तुरुंग विभागाने कम्युनिटी रेडिओ स्टेशनसाठी निविदा काढल्या आहेत. यासाठी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरात लवकर यासाठी योग्य कंपनीची निवड केली जाईल आणि रेडिओ स्टेशन उभारलं जाईल.

तसेच रेडिओ जॉकी म्हणून आठ ते दहा कैद्यांनी तयारी दर्शवली आहे. चंदिगढ मधील व्यावसायिक रेडिओ जॉकी यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देणार आहेत. कैद्यांना स्टेशनची प्रोग्रामिंग, सॉफ़्टवेअर सिस्टीम इत्यादी तांत्रिक गोष्टीचं शिक्षण देखील दिलं जाणार आहे, अशीही माहिती विराट यांनी दिली आहे.

विराट पुढे म्हणाले की, तुरुंगातील या रेडिओ स्टेशनवरून संगीत, प्रेरणादायी कथा, आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी वृत्तपत्र वाचन असे विविध कार्यक्रम देखील प्रसारित केले जातील. तसेच कैद्यांना हे कार्यक्रम ऐकता यावेत यासाठी प्रत्येक बराकीत स्पीकर्स देखील बसवण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सलग 17 व्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; वाचा आजचा दर

गाडीसमोरुन अचानक सिंह शिकार करण्यासाठी धावून आला अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

मिका सिंगने नॅशनल टीव्हीवर ‘या’ सिंगरला लग्नासाठी घातली मागणी; व्हिडीओ व्हायरल

महिलेवर बलात्कार करून पळत होता आरोपी, कुत्र्याने केलं असं काही की आरोपी गेला गजाआड

कॅमेरा चालू असतानाच योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल