मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भूमिक मांडली. यावेळी बोलताना राज ठाकरेंना पत्रकारांनी हिंदीत बोलण्याचं आवाहन केलं. यानंतर माझी हिंदी चांगली नाही रे म्हणत राज ठाकरेंनी हिंदी बोलण्यास नकार दिला.
पत्रकारांनी आग्रह केल्यानंतर राज ठाकरेंनी हिंदीत भूमिका मांडली. मात्र सुरूवातीला हमारे कायकर्ता का धरपकड्या चल रहा है, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर राज ठाकरेंची मराठी मिक्स हिंदी ऐकल्यानंतर एकच हशा पिकला. उपस्थित पत्रकार खळखळून हसले.
जवळपास 90-92 टक्के महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. मशिदीमधील मौलवींचं मी आभार मानेन, आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला, असं म्हणत त्यांनी मौलवींचं कौतुक केलं.
मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली, असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार?, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे.
आज अजान दिली नाही म्हणून आम्ही खूश होणार नाही, दिवसभरात ज्या ज्या वेळी अजान लागेल त्या त्या वेळी हनुमान चालिसा लागेल. हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मानले त्या मौलवींचे आभार, म्हणाले…
जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे
संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी
‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ
मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं