Loading...
देश

पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??; राहुल गांधींचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्याच्या वर्षपुर्तीनिमित्त शहीद झालेल्या सैनिकांची आठवण काढत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याने कोणाला सर्वात जास्त फायदा झाला. कोणाला तोटा झाला?  चौकशीत नेमकं काय पुढे आलं आणि सरकारने याबाबत कुणाला जबाबदार धरले? असे सवाल राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.

आज जेव्हा आपल्याला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सैनिकांची आठवण येते तेव्हा या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला हे आपल्याला विचारावे लागेल, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

Loading...

पुलवामा हल्ल्याच्या चौकशीतून नेमकं काय पुढे आलं हे सगळ्यांना कळायलं पाहिजे. तसंच भाजप सरकारने हल्ल्यासंबंधी कुणाला दोषी ठरवलंय हे ही सांगावं, असंही राहुल म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी 14 फेब्रु. रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

-गेहलोत सरकारने ग्रामीण विकास योजनेचं नाव बदललं; गोळवळकर हटवून केलं महात्मा गांधी!

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

Loading...

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

-शिवरायांवरच्या टिकटाॅक वरील या व्हीडिओने सोशल मीडियावर घातला चांगलाच धुमाकूळ!

Loading...