Loading...
देश

खरे चाणक्य कोण शरद पवार की तुम्ही??; अमित शहांचं उत्तर चर्चेचा विषय

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला पहिल्यांदाच मुलाखत दिली. यावेळी त्यांना खरे चाणक्य कोण तुम्ही की शरद पवार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर सोशल मीडियात तुफान धुमाकूळ घालत आहे.

शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारं पाडली आहेत. नवीन सरकारं स्थापनही केली आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी मुलाखतकाराच्या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.

Loading...

मी चाणक्यनिती खूप वाचली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान चाणक्य यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही, असंही शहा म्हणाले.

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपचे 105 आमदार निवडून येऊन देखील त्यांचंं सरकार येऊ शकलेलं नाही. तसंच दिल्लीत देखील भाजपचा लाजीरवाणा पराभव स्विकाराला लागला. त्यानंतर अमित शहा यांची जादू फिकी पडल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहणार भिंत

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

Loading...