विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी

मुंबई |  राज्यामध्ये स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार, सरकार स्थापनेवेळी विभिन्न पक्षाचे आणि विचारसरणीचे एकत्रित आलेले लोक यांचा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर शिवसेना कोणत्या विचारातून प्रेरित होऊन गेली असं म्हणत माझा विचार, माझी संघटना मी कधी सोडणार नाही… मी विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असा ठाम विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. शनिवारी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

गडकरींनी तुफान फटकेबाजी करत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावले. तसंच फक्त भाजपला हरवण्यासाठी एकत्रित येणाऱ्या राजकीय पक्षांवर देखील त्यांनी टीका केली. जे एकमेकांना बोलत नव्हते, एकमेकांना साधा नमस्कार देखील करत नव्हते ते आता एकत्रित आले आहेत. राजकारण हे क्रिकेटसारखं आहे. इथं कधीही काहीही होऊ शकतं, असं ते म्हणाले.

काँग्रेस राष्ट्रवादीचा नेमका कोणता विचार शिवसेनेला पटला, याचा एकही धागा मला समजला नाही, असं गडकरी म्हणाले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने घेतलेल्या शपथविधीवर नितीन गडकरी म्हणाले-

अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेली शपथ समजू शकतो. अजित पवारांनी पहाटेला शपथ घेताना केलेला विचार देखील समजू शकतो. परंतू अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपबरोबर आले होते. त्यामुळे परिवर्तन होतं, असं म्हणता येईल.

नायदर रायटिस्ट नॉर लेफिस्ट वुई आर अ‌ॅपोरचुनिस्ट, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. तर या देशात मतभिन्नता हा विषय नाहीये. मतभिन्नता हा विषय असला पाहिजे पण मनभिन्नता नको पण मतभिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही मोठी समस्या आहे. माझा विचार, माझी संघटना मी कधी सोडणार नाही. मी एकवेळ जीव देईन विहिरीत पण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-शेवटचे भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुरड्या शंभुराजांची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

-देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील

-“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय??”

-“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”

-महाविकास आघाडीत शिजतंय तरी काय?? वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक