बोटमध्ये चप्पल घालून चढणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला अटक

मुंबई | कलाकार आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे सतत कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. अशातच आता एक मल्याळम टीव्ही सीरिअल अभिनेत्री निमिषा हिला बोटीमध्ये चप्पल घालून चढल्याने अटक झाली आहे.

निमिषा तिच्या मित्रांसह अरनमुला मंदिराच्या पल्लीयोदमात फिरायला गेली होती. निमिषाने यावेळी आपल्या मित्रांसह तेथील धार्मिक बोटीत काही फोटोज काढले आणि हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले.

निमिषा बोटीमध्ये चप्पल घालून चढलेली या फोटोजमध्ये स्पष्ट दिसत होतं. यामुळे नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट करत तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तिला कमेंटमध्ये अर्वाच्च भाषा देखील वापरली.

नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर निमिषाने हे फोटोज आपल्या आकाऊंटवरून डिलीट केले. याप्रकरणी शनिवारी निमिषाला अटक करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी तिची देखील बाजू नोंदवली आहे.

तसेच निमिषाचे फोटो खेचणाऱ्या फोटोग्राफरचे देखील बयान नोंदविण्यात आले आहेत. अटकेनंतर काही तासांनीच निमिषाची जामिनावर सुटका करण्यात आली. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगनंतर निमिषाने देखील याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगनंतर निमिषाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये निमिषाने फोन आणि सोशल मीडियाद्वारे अज्ञात लोकांकडून धमकी आणि शिवीगाळ होत असल्याचं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थची ‘त्या’ रात्रीच्या अर्ध्या तासाची कॉल हिस्टरी समोर, विशालने केला खुलासा

…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण

दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं, अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?

सिद्धार्थच्या मृत्यूमुळे कोलमडलेली शेहनाज ग्लुकोजवर? डिझायनरने केला खुलासा