Loading...
महाराष्ट्र मुंबई

हिंगणघाटची निर्भया गेली; माझ्यातली आई सुन्न झालीये- यशोमती ठाकूर

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडितेने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत असून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Loading...

पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. यात पीडिता 40 टक्के भाजली होती. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक होता. तिला आज सकाळी 2 वाजता दोन ह्रद्यविकाराचे झटके आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, माझ्या मुलीला जितका त्रास झाला तितका त्या नराधमाला झाला पाहिजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, मला त्याला जिंवत जळालेलं पाहिचं आहे, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज साहेब, तुम्ही हिंसा करण्याची भाषा करत असाल तर…- नवाब मलिक

-नराधमाला माझ्यासमोर जाळून मारा; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

-…म्हणून मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

-हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी

-“राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच!”

Loading...