ठरलं तर! योगी अयोध्येतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

लखनऊ | देशाच्या केंद्रीय राजकारणाचा रस्ता हा उत्तर प्रदेशामधून जातो, असं राजकीय जाणकार सांगतात. परिणामी सर्वपक्षांची नजर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यावर आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण पेटलं आहे.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता आहे. आदित्यनाथ यांच्यासमोर पुन्हा सत्ता मिळवण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. योगी या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालं आहे.

योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून विधानसभा लढवणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं योगी यांना गोरखपूरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उत्तर प्रदेशमधील 105 जागांसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ आपल्या गडामधून म्हणजेच गोरखपूरमधून मैदानात उतरले आहेत.

एकुण 105 उमेदवारांपैकी 60 टक्के उमेदवार हे ओबीसी आणि इतर जातींमधील आहेत. तर विद्यमान 21 आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

गोरखपूर या मतदारसंघातूनच योगी आदित्यनाथ हे खासदार म्हणून सातत्यानं निवडून येत होते. आता त्यांना गोरखपूर शहर विधानसभेत पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांना प्रयागराजमधील सिराथू मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे.

दरम्यान, निवडणुकीला महिना शिल्लक असताना उत्तर प्रदेश भाजपच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत 12 हून अधिक आमदारांनी पक्ष सोडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 “…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल

  “कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”