Loading...
पुणे महाराष्ट्र

रोहित पवारांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नावर तरूणाचा थेट त्यांनाच प्रश्न!

पुणे |  रोहित पवार हे अनेक प्रकारच्या कार आणि दुचाक्यांचे धनी आहेत. आवडलेली गाडी ते खरेदी करतातच. मात्र एका दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी स्वत:च्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचं माझं स्वप्न असल्याचं बोलून दाखवलं. त्यांच्या याच स्वप्नावर एका तरूणाने त्यांना आज ट्वीटरवर प्रश्न विचारला आणि रोहित पवार यांनीदेखील त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

रोहित सर, तुम्ही कष्टाच्या पैशातून हेलिकॉप्टर खरेदी करणार आहात… तुमचं कष्ट कोणत्या प्रकारचं असेल. AC कारमध्ये फिरणे आणि AC ऑफिस मध्ये राहणे हे का?? माझे बाबा रोज शेतात कष्ट करतात त्याचं कष्ट समजू शकतो मी… तुमचं कष्ट समजवाल का??? असा तिखट प्रश्न त्याने रोहित पवार यांना विचारला.

Loading...

तरूणाच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित म्हणाले, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेलं उत्तरं होतं. ते तुम्ही शब्दशः घेऊ नका. आपल्याला सर्वांसाठी मला काम करायचं आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी आज ट्वीटरवरून तरूणांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच तरूणांच्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-महामोर्चाआधी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा

-नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत

Loading...

-महाराष्ट्राला झालंय तरी काय?? अभिनेत्री मानसी नाईकची तरूणांकडून छेडछाड

-….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!

-चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

Loading...