लक्षात ठेवा… युट्यूब संपेल पण इंदुरीकरसंपणार नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर

अहमदनगर |  पुत्रप्रातीसाठी ऑड-इव्हनचा फॉर्म्युला दिल्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अडचणीत आले आहेत. NCPNDT या कायद्यांतर्गत त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे तर अंनिसच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. या सगळ्या प्रकरणावर इंदुरीकर महाराजांनी कालच्या कीर्तनातून भाष्य केलं आहे.

गेल्या चार दिवसांत मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. हे जर सगळं प्रकरण थांबलं नाही तर किर्तन सोडून शेती करू. पण युट्यूबवाल्यांनी लक्षात ठेवावं युट्यूब संपेल पण इंदुरीकर महाराज संपणार नाही, असं इंदुरीकर महाराजांनी ठणकावून सांगितलं.

इंदुरीकर महाराज म्हणाले-

काय माझ्या मागं लागलेत हे युट्यूबवाले आणि कॅमेरावाले… पार इंदुरीकर संपवला त्यांनी… काय नाय महाराज मी बोलतोय हे खरंचय… त्यांना काय सापडंना म्हणून माझ्या कीर्तनात काहीतरी बघत्यात अन् मला गुतवत्यात… उदया परवाचा दिवस जाऊन द्यायचा… आता लय झालं… आता फेटा ठेऊन द्यायचा.. आता आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली…

ऑड इव्हनच्या फॉर्म्युल्यावर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले-

26 वर्ष झालं महाराज बायको नाय.. पोरगा नाय… रात्रंदिवस प्रवास… कष्ट… कष्ट… कष्ट…. लोकांसाठीच करायचं फक्त… दोन अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जातं… गेलेलं वाक्य चुकीचं नाहीच… ऑड इव्हनचा फॉर्म्युला हा भागवतात सांगितलाय. गाथेत पण सांगितलाय अन् ज्ञानेश्वरीत पण सांगितलाय. मी बोलतो हे खरंय… तरी लोकं मला म्हणत्यात ह्याला पहिली ठेऊन द्या…

तीन दिवसांत मी अर्ध्या किलो कमी झालो. माझी सहन करायची कॅपॅसिटीच संपली. हे जर तीन दिवसांत नाही थांबलं तर आता शेती करतो, असं ते म्हणले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये; भाजप नेत्याची खरमरीत टीका

-शांततेच्या मार्गानं सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरत नाही- हाय कोर्ट

-भाजपकडून सातारचे उदयनराजे भोसले जाणार राज्यसभेवर!

-महाविकास आघाडीचा विद्यार्थ्यांना दिलासा; महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय!

-अमृता फडणवीसांचं नवं इंग्रजी गाणं सोशल मीडियावर ट्रोल!