युवी अन् भज्जीने मदतीचं आवाहन केलं पण पाकच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

मुंबई |  कोरोनाचा सामना करण्यासाठी किंबहुना त्यातून सावरण्यासाठी अनेक क्रिकेटपटूंनी मदतीचा हात दिला आहे. परंतू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी केलेल्या मदतीच्या आवाहानमुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. सोशल मीडियावर चाहते चांगलेच भडकले आहेत.

युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनीशाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

जगातली लोकं कठीण काळातून जात आहेत. आपल्याकडून प्रयत्न केले गेले पाहिजेत. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन चांगलं काम करत आहे. तुम्ही त्याला साथ द्या आणि जेवढी मदत करणं शक्य असेल, तेवढी मदत करा, असं हरभजन व्हीडिओमध्ये म्हणत आहे.

दरम्यान, भारतासाठी मदत मागण्याचं सोडून युवी आणि भज्जीने पाकच्या शाहीद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी मदत मागितल्याने चाहते चांगलेच खवळले आहेत. ज्ञान पाजळण्यापेक्षा तुम्ही आधी भारताला मदत केली असती तर ते अधिक फायदेशीर ठरलं असतं, असं चाहत्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

-28 मार्चच्या रात्री 2 वाजता अजित डोवाल मौलाना सादला भेटले, केली ही गोष्ट

-“इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचं जगावर सावट”

-अझीम प्रेमजींचं दर्यादिल… पाहा त्यांनी खरंच किती रक्कम मदत दिलीये

-अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

-जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा- अजित पवार