मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात (Car Accident) मृत्यू (Death) झाला.  या अपघातावेळी त्याच्या कारमध्ये एका महिलाही असल्याची माहिती समोर आली आहे. तो आपल्या कारमधून मित्रांसोबत दिल्लीवरून पंजाबला जात होता.

कुंडली बॉर्डरजवळ त्याच्या कारचा आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृ्त्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

देशातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला त्यान जाहीर पाठिंबा दिला होता. याप्रकरणात त्याच्या गुन्हाही दाखल करुन त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.

देशात ज्यावेळी कृषि कायद्यासाठी दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आंदोलनातील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी लाल किल्ल्यावर काही लोकांनी झेंडा लावल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उसकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या या घटनेत पाचशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर हे आंदोलन उसकवण्यासाठी तो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

अभिनेता आणि गुरुदासपूर लोकसभेच्या मतदारसंघातून खासदार झालेला सनी देओलने या आंदोलनानंतर दीप सिद्धूचा आणि आपला काही संबंध नाही असे जाहीर केले होते.

2019 च्या निवडणूकीत दीप सिद्धू हा त्याच्या निवडणूकीतील महत्वाचा भाग होता. त्यावेळी दीप सिद्धूने सनी देओलचा जोरदार प्रचार केला होता.

महत्वाच्या बातम्या-   

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”