शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांची झोप उडाली

नाशिक | देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. अनेक राजकीय नेते, दिग्गज कलाकार, शासकीय अधिकारी सर्वचजण याच्या विळख्यात सापडले आहेत. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना आता कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

नाशिकमधील येवला शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसागणिक येथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा वाढतच चालला आहे. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे हे याच येवला शहरात राहतात.

काही दिवसांपूर्वी दराडे नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचं त्यांना समजलं. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली. हा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी आता उपचारासाठी मुंबईत धाव घेतली आहे.

नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट समजल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसैनिकांसह अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत सुरू आहे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत पण… अमिताभ बच्चन झाले भावुक!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल