Top news महाराष्ट्र मुंबई

एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू- उद्धव ठाकरे

मुंबई |   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला तसंच घाबरून न जाण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी त्यांनी एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू, असा आत्मविश्वास जनतेला दिला.

मुख्यमंत्र्यांनी आज कठोर शब्दात विकृतांचे वाभाडे काढले. मी कोणतंही पाऊल उचलेल अन् माझ्या महाराष्ट्रातील जनतेला कोरोनापासून वाचवेल पण विकृतांना नंतर सोडणार नाही. फळांना थुंकी लावून जे फळं विकत आहेत. डॉक्टर नर्सवर थिंकत आहेत. त्यांना माझा इशारा आहे की दुही माजवण्याचा प्रयत्न करताल तर तुम्हाला कुणीही वाचवणार नाही, अशा कठोर शब्दात त्यांनी विकृतांना खडे बोल सुनावले.

कोरोनाला हरवायचं असेल तर आपल्याजवळ आत्मविश्वास हवा. माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. जर एखाद्याला हरवायचं असेल किंवा मात करायची असेल तर आत्मविश्वासाशिवाय दुसरं कोणतंही बल नाही. त्यामुळे आत्मविश्वास बाळगूया आणि संयम ठेवूया. कारण हा सगळा खेळ संयमाचा आहे. जशी आतापर्यंत साथ दिली तशीच इथून पुढेही साथीची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, इथून पुढे पुढचा आदेश येईपर्यंत धार्मिक किंवा सामाजिक गोष्टींसाठी 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रार्थनास्थळांवर जाऊ नका. कृपा करा आणि घरी बसा, असं आवाहन त्यांनी आज पुन्हा एकदा केलं.

महत्वाच्या बातम्या –

-मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे

-निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!

-डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा- अमित शहा

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या”

-देशात राहून बेइमानी करणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा, भोजपुरी अभिनेत्याची पंतप्रधानांकडे मागणी